११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - | उपमुख्यमंत्री अजित पवार

___मुंबई : मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकयांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकयांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.